
महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून राज्यसभेच्या या एका जागेसाठी सदस्याची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून २०२६ असून, हे अर्ज विधान भवन, मुंबई येथे विहित मुदतीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी ९ जून रोजी दुपारी १२ वाजता विधान भवन येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या जागेसाठी निवडणूक लढविली गेल्यास १८ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव-२ मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव मोहन काकडे आणि अवर सचिव सुरेश मोगल हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.