Home महाराष्ट्र श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

The foundation stone laying ceremony for the first phase of beautification works of the Shri Siddhivinayak Temple premises was performed by Chief Minister Devendra Fadnavis.

श्री सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात. भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद शंकर सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, तसेच सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते

error: Content is protected !!
Exit mobile version