Home महाराष्ट्र भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. आणि ग्रेटा एनर्जी प्रा....

भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. आणि ग्रेटा एनर्जी प्रा. लि. च्या एकात्मिक हरीत पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

The foundation stone laying ceremony of the integrated green steel project of New Era Cleantech Pvt. Ltd. and Greta Energy Pvt. Ltd. in the Bhadravati MIDC area was held by Chief Minister Devendra Fadnavis.

केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, माजी मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अजय संचेती, कोल इंडियाचे चेअरमन संजीव कुमार झा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी, वैभव काकुलते, व्यवस्थापकीय संचालक हेमंत पांडे (वेकोली), अनुप गोयल (ग्रेटा एनर्जी), बाळासाहेब दराडे (न्यू एरा क्लिनटेक), मधुसूदन अग्रवाल, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

विदर्भातील विपुल खनिज संपत्तीचे प्रदुषणमुक्त नियोजन करूनच भद्रावती परिसरात दोन हरीत पोलाद प्रकल्प उभारण्यात येत आहे. भारताच्या इतिहासात एका आगळ्यावेगळ्या उद्योगाचे आज भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे भूमिपूजन होत आहे. वातावरण बदल हा जगासमोर मोठा प्रश्न आहे. त्याचा फटका शेतीसोबतच उद्योगांनाही बसतो. त्यामुळे खनिज संपत्तीचा प्रदुषणमुक्त उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जगातील उत्तम तंत्रज्ञानसह खनिजांचे उत्पादन करण्यास पुढाकार घेतला आहे. याच माध्यमातून कोल गॅसिफिकेशनचे सात प्रकल्प येत आहेत, त्यापैकी चार प्रकल्प महाराष्ट्रात आणि तेही विदर्भात येणार आहे. असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या दोन्ही उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडणार आहे. न्यू एरा आणि ग्रीन एनर्जी या दोन्ही उद्योगांच्या माध्यमातून या परिसरात १० हजार रोजगार उपलब्ध होईल. मायनिंग आधारित उद्योगांमुळे पूर्व विदर्भातील अर्थव्यवस्था बदलत आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

000

चंद्रपूर आणि भद्रावती या भागात नवीन तंत्रज्ञानायुक्त औद्योगिक कंपनी येत आहे. यातून या भागाचा विकास होईल. दोन्ही कंपन्यांच्या आगमनाने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून १७ हजार कोटीची गुंतवणूक भद्रावती येथे येत आहे – केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी

error: Content is protected !!
Exit mobile version