Home महाराष्ट्र नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून...

नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले.

The listing of Nashik Municipal Corporation's 'Green Bond' was done by Chief Minister Devendra Fadnavis by ringing the 'ringing bell'.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे ‘इनोव्हेटिव्ह फंड’ निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यातील छोट्या महापालिकांमधील विकास कामे करण्यासाठी एकत्रितपणे १ हजार कोटी रुपयांचे अशाच प्रकारचे बॉण्ड भांडवली बाजारात काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून महापालिकांनाही केंद्र शासनाच्या या योजनांचा लाभ मिळेल. नाशिक महापालिकेने अशाच पद्धतीने इनोव्हेटिव्ह फंडच्या माध्यमातून गुणात्मकदृष्ट्या शहराचा विकास करावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

नाशिक महानगरक्षेत्रात जवळपास २५ हजार कोटींची विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत. कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या विकास कामांमुळे निर्माण होणारी व्यवस्था कुंभ साठीच नाही, तर नाशिक शहर विकसित महानगरांच्या श्रेणीमध्ये आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. यामुळे पुढील काळात नाशिक हे गुंतवणुकीचे चुंबक म्हणून उदयास येणार आहे, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

#GreenMunicipalBond

error: Content is protected !!
Exit mobile version