Home महाराष्ट्र बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी मासूम प्रकल्प राबविण्यात...

बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी मासूम प्रकल्प राबविण्यात येतो.

The Masum Project is implemented to provide emotional and social support to children living in childcare institutions.

मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे.

महिला व बाल विकास विभाग आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ‘ईमपॉवर’ उपक्रम यांच्यातील परस्पर सामंजस्य करारातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रकल्पांतर्गत २० संस्थांमधील १,८६१ मुलांना लाभ मिळाला असून ५,००० हून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत. मानकीकृत मूल्यांकन साधनांच्या आधारे मुलांच्या भावनिक स्थैर्यात आणि सामाजिक वर्तनात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच पालक व पालक प्रतिनिधींनाही समुपदेशन देऊन कुटुंबीय नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version