Home पर्यटन सवतकडयावर येणाऱ्या पर्यटकांचे मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठान‌तर्फे स्वागत आणि काळजी घेण्याचे केले...

सवतकडयावर येणाऱ्या पर्यटकांचे मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठान‌तर्फे स्वागत आणि काळजी घेण्याचे केले आवाहन

1
The Mauje Chunakolvan Ambikeshwar Pratishthan welcomed tourists visiting Savtakada and urged them to take care of their safety.

चुनाकोळवण(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा हे पर्यटनस्थळ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून निसर्गाचे मोहक रुप अनुभवण्यासाठी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे मुंबई आणि राज्यातील विविध भागातून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत ‌पर्यटनस्थळावर येणाऱ्या सर्व पर्यटकांचे  मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठाने स्वागत केले आहे. सवतकडा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आपण इथे आला आहात त्याचा आम्हालाही आनंद आहे फक्त हा आनंद सर्वांना कायमस्वरूपी घेता यावा आणि हा निसर्गाचा ठेवा चिरंतर राहावा यासाठी आपण या ठिकाणी खालील प्रमाणे काळजी घेणे जरुरीचे आहे असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. एक स्वतःचा प्राण सुरक्षित ठेवून धबधब्याचा आनंद घ्या अतिधाडस पंचमहाभूतांकडे माफ नसते म्हणून पाण्याचा अंदाज घेऊन थोडे गांभीर्य ठेवून वागावे. धबधब्याचे पाणी माझ्या कृत्याने खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. धबधबा परिसरामध्ये खाण्याचा पदार्थ खाऊन झाल्यानंतर कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात योगदान द्यावे. प्लास्टिक मुळे निसर्गाचे हानी होते याची आपल्याला कल्पना आहे त्यामुळे प्लास्टिक वस्तू पिशव्या बॉटल डबे अशा अनेक वस्तू तिथे न टाकता सोबत घेऊन जावे.
मद्यपान अथवा तत्सम व्यसन करण्यासाठी हा परिसर नक्कीच नाही त्यामुळे निर्भेळ आनंद माझ्यासारख्या इतर पर्यटकांना सुद्धा मिळेल पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध राहा. आंघोळी केल्यानंतर अथवा धबधब्याखाली भिजताना पाहणाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करू नये. फोटोग्राफी करण्याचा मोह जरूर होईल परंतु आंघोळ करायला आलेल्या पर्यटनामध्ये स्त्रिया लहान मुले आहेत त्यांचे भान ठेवून फोटोग्राफी करावी. मी सुद्धा या पर्यटनाचा एक भाग आहे त्यामुळे हे पर्यावरण चक्र माझ्यामुळे बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आपत्कालीन स्थितीत उद्भभली तर संबंधित यंत्रणेला लगेच कळवणे आवश्यक आहे.  कडा धोकादाक आहे खोल दरी आहे त्यामुळे धबधब्याच्या टोकावर जाणे टाळावे. इतर पर्यटकांना त्रास होईल अथवा वर्तणूक करू नये. जेणेकरून भांडणासारखे प्रसंग निर्माण होतील.
निसर्गाचा नयनरम्य देखावा बघण्यासाठी उंचावरून कोसळणारे पाणी अंगावर घेत आपल्याला आलेली टेन्शन थकवा चुटकीसरशी जाण्यासाठी काळजी घेऊन फेसाळणाऱ्या या सवतकडा धबधब्याचा आनंद लुटा असे आवाहन मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केले आहे.