Home महाराष्ट्र माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पवनार...

माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पवनार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

The mortal remains of former MP and former Minister of State Dattaji Meghe were cremated with state honours in his native village of Pavnar.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य मान्यवरांनी दत्ताजी मेघे यांच्या पत्नी शालिनीताई दत्ताजी मेघे, पुत्र सागर मेघे व आमदार समीर मेघे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

#दत्तामेघे

error: Content is protected !!
Exit mobile version