Home आरोग्य जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी –...

जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी – मंत्री शंभूराज देसाई

0
The process of filling vacant posts in the District Health Department must be completed as soon as possible – Minister Shambhuraj Desai.

सातारा : आरोग्य विभागास आता बाह्यस्रोतांद्वारे पद भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने कार्यवाही करून रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत तसेच स्मार्ट पी.एच.सी.ची उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी (दि.१५) दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आरोग्य अभियानाची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खालीपे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट पी.एच.सी.साठी नियोजन विभागाने दिलेला निधी पूर्ण खर्च करण्यात यावा, अशा सूचना करून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, काही पी.एच.सी.ची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत ती तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच ज्या ठिकाणी जुनी इमारत निर्लेखनाचे काम आहे, ते मार्गी लावावे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जेदार वास्तू उभारण्याची कामे पूर्ण करून मगच नवीन निधी मागणी करावी.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीचीही बैठक झाली. त्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक तयार करणे, क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी जलतरण तलावाची थकीत असलेली रक्कम वसुलीस मंजुरी देण्यात आली.