Home महाराष्ट्र सिंदी रेल्वे येथील वन जमीनीवरील 82 घराचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पुर्ण

सिंदी रेल्वे येथील वन जमीनीवरील 82 घराचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पुर्ण

The process of removing encroachments of 82 houses on forest land at Sindhi Railway has been completed.

वर्धा : गेल्या अनेक वर्षापासून सिंदी रेल्वे येथील मौजा परसोडी शिवारात वन विभागाच्या सर्वे नंबर 26, 27 व 28 वरील 3 हेक्टर जमिनीवर 82 कुटूंबांनी अतिक्रमण करुन कच्चे व पक्के घराचे बांधकाम केले होते. आज वन विभागाने पोलिस विभागाच्या मदतीने कायदेशिर कार्यवाही करुन 82 घराचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण केली.

आज सकाळी 7 वाजता पासून सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे व माधव आडे यांच्या मार्गदर्शनात 130 वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलिस विभागाच्या 300 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात कार्यवारी करण्यात आली. कार्यवाही दरम्यान कुठलीही अनुचित घटना न घडता शांततेत कार्यवाही पार पडली. सेलूच्या तहसिलदार शंकुतला पाराजे, सिंदीचे नायब राजेंद्र मंथनवार तहसिलदार यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!
Exit mobile version