Home महाराष्ट्र धरणांतील गाळ काढल्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढते. याबरोबरच पूर नियंत्रणासाठी याची...

धरणांतील गाळ काढल्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढते. याबरोबरच पूर नियंत्रणासाठी याची मदत होत असल्याने या कामास जलसंपदा विभागाने प्राधान्य द्यावे.

The water resources department should prioritize this work as it increases the water storage capacity of dams by removing silt from them.

यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

धरणातील गाळ काढण्याबाबतच्या प्रस्तावाच्या सद्यस्थितीच्या आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. गुणाले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव प्रसाद नार्वेकर, संजीव टाटू, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version