
लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल. पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन विभाग आणि ट्रॅफिक प्लॅनर नेमण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
विधानसभालक्षवेधी
पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे २०२८ पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.