Home शैक्षणिक तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात सार्वजनिक...

तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून ‘वाचन संकल्प

To attract the younger generation towards reading books and to increase the reading culture, ‘Vachan Sankalp’ is being implemented through public libraries in the state.

महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालयातील वाचक यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचन करण्याचा सामूहिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण व पुस्तक कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट व सामूहिक ग्रंथ वाचन कार्यक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळा, विद्यार्थी – लेखक परीसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वाचनसंस्कृती वाढवावी, असे आवाहन राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version