(नंदुरबार)
30 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान या रेल्वे क्रॉसिंग गेटवर देखभाल-दुरुस्तीचे नियोजित काम सुरू होणार होते. यामुळे, जिल्हा प्रशासनाने वाहतूक वळवण्याचा आदेश दिला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून 2 फेब्रुवारी 2025 रोजी माहिती मिळाली की हे काम निर्धारित वेळेच्या आधीच पूर्ण झाले आहे.
रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वाहतूक वळविण्याचा आदेश रद्द केला असून, रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 74 पूर्ववत सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे वाहनचालक व प्रवाशांना आता कोणताही अडथळा न येता त्यांच्या मार्गाने प्रवास करता येणार आहे.
#Nandurbar#RailwayUpdate#TrafficUpdate#Maharashtra#FastNews#BreakingNews#ViralNews#RailwayCrossing#GoodDecision
