Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

Tributes paid to Chhatrapati Shivaji Maharaj on his death anniversary at Vidhan Bhavan

मुंबई: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, उप सचिव विजय कोमटवार, उप सभापती यांचे खाजगी सचिव आविनाश रणखांब, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

error: Content is protected !!
Exit mobile version