Home महाराष्ट्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

Tributes paid to Father of the Nation Mahatma Gandhi at the District Collector's Office

अमरावती: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आदरांजली वाहिली.

error: Content is protected !!
Exit mobile version