(प्रकाशा) नंदुरबार जिल्ह्याच्या संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.० वाटप कार्यक्रम प्रकाशा गावात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, यांच्यासह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि बंधू भगिनी उपस्थित होत्या.
याप्रसंगी २४० महिलांना गावात प्रथमच प्रधानमंत्री गॅस किट वाटप केल्या. तसेच या योजनेच्या पाठपूरवठ्या पासून तर जिल्ह्यातील दिड लाख महिलांना मिळालेल्या लाभ या बद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांना मिळेल व कोणीही बेघर राहता कामा नये या साठी येणाऱ्या काळात प्रत्येक गावातून जास्तीत जास्त घरकुल योजनेचा लाभ आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेबद्दल देखिल माहिती दिली.घरकुल योजनेचा फॉर्म कसा भरावा याविषयी देखील नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि आदिवासी विकास विभागातून शबरी घरकुल योजना ,दलित समाजाने रमाई घरकुल योजना, इतर मागासवर्गीय समाजाने यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, राखीव समाजाने ड गटातून अश्या प्रकारे नियोजन करून आपण जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देऊ अशी ग्वाही याप्रसंगी खासदार डॉ.हिना गावित यांनी दिली.
केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणजे उज्वला गॅस योजना आहे. या योजनेच्या दुसरा टप्पा सुरू झाला आहे. शहादा शहरातील आणि ग्रामीण भागातील तीन हजार गरीब कुटुंबांना उज्वला गॅस योजनेच्या लाभ देण्यात आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेच्या पहिला भागात अनेक महिलांना उज्वला गॅस योजनेच्या फायदा झाला होता, मात्र काही कुटुंब उज्वला योजनेपासून वंचित राहिले होते. त्यामुळे उर्वरित कुटुंबांना उज्वला गॅस योजनेच्या दुसरा भागात मोठ्या प्रमाणावर उज्वला गॅस योजनेच्या लाभ देण्यात येत असून शहादा शहरातल्या आणि तालुक्यातील महिलांना तीन हजार महिलांना उज्वला गॅस योजना अंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर आणि शेगडीच्या वाटप करण्यात येत आहे. उज्वला योजनेमुळे शहादा शहरातील आणि तालुक्यातील महिलांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्हापरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजनेबद्दल व त्याच्या लाभा बद्दल मार्गदर्शन केले.बचत गटाच्या विविध योजना आहेत त्या माध्यमातून गृह उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.हेमलता ताई शितोळे पाटील,माजी सभापती रामचंद्र पाटील, मंदिराच्या ट्रस्ट चे अध्यक्ष मोहन पाटील,ग्रामपंचायत सरपंच ,उसरपंच,ग्रा.प सदय महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये :
![](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Ujjwala-Gas-Yojana-1024x576.png)