मुंबई: डिजिटल प्रणाली वापरामुळे शेतकऱ्यांना अधिक परिणामकारक आर्थिक नियोजन करता येते आणि उत्पादनक्षमतेत सुधारणा होते. शेती आणि वित्त हे दोन वेगवेगळे विभाग म्हणून काम करतात. प्रत्यक्षात तो केवळ व्यवहार नसतो ती एक व्यापक परिसंस्था आहे यामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा भाग आहे. दोघांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्म जबाबदारीने विस्तार झाला पाहिजे, असे मत दुसऱ्या दिवशीच्या डिजिटल कृषी वित्तीय मॉडेल्सचा विस्तार या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) दुसऱ्या दिवशीच्या डिजिटल कृषी वित्तीय मॉडेल्सचा विस्तार (Scaling up Digital Agri Finance Models) या चर्चासत्रात मत व्यक्त केले.
या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून जागतिक बँकेच्या इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आणि डिजिटल लीड, सुश्री फंगफंग जीयांग होत्या. प्रमुख वक्ते सॅटसूर बचे रिजन चीफ रेव्हेन्यू ऑफिसर ध्रुव, गेटस् फांउडेशनचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चतुर्वेदी, द्वारा होल्डींग्जचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअर, सह-संस्थापक समीर शाह हे होते.
जागतिक बँकेच्या इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आणि डिजिटल लीड, सुश्री फंगफंग जीयांग यांनी त्यांच्या कृषीविषयक माहितीचे सादरीकरण केले.आयएफसीच्या ध्येयावर प्रकाश टाकत केली त्यांचे काम १०० पेक्षा अधिक देशांमध्ये आहे आणि जागतिक स्तरावर २०० हून अधिक कृषी प्रकल्पांमध्ये आणि आशियातील ५६ प्रकल्पांमध्ये सहभाग आहे. त्यांनी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख संरचनात्मक आव्हानांवर चर्चा केली, हवामानातील बदलांमुळे निर्माण होणारी असुरक्षितता आणि औपचारिक कर्जप्रवेशाची मर्यादा. त्यांनी शासन आणि खासगी क्षेत्र यांच्यात वाढत्या सहकार्यावर भर दिला, विशेषतः पुढील तंत्रज्ञानांच्या वापराद्वारे हवामान डेटा (Weather Data),उपग्रह प्रतिमा (Satellite Imagery), प्रशासकीय डेटासेट्स, पर्यायी आणि मजकूर-आधारित डेटा, हवामान नमुन्यांचा अंदाज व पीक उत्पादनाचे भाकीत करणारे शासन-प्रणीत बिग डेटा प्लॅटफॉर्म. आयओटी आधारित पर्यावरणीय निरीक्षण, एआयआधारित पशुवैद्यकीय सल्ला, डिजिटल उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी एकत्रीकरण आणि वित्तीय सेवांचा समावेश असलेली स्मार्ट शेती परिसंस्था विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ध्रुव राजन यांनी उपग्रह-आधारित पीक ओळख आणि कृषी-वित्त डिजिटायझेशन क्षेत्रातील १५ वर्षांच्या अनुभवावर आधारित माहिती मांडली. त्यांनी स्पष्ट केले की उपग्रह डेटा मोठ्या प्रमाणावर अचूक पीक नकाशांकन (crop mapping) आणि जोखीम मूल्यांकन करण्यास सक्षम करतो. तंत्रज्ञान-आधारित पडताळणीमुळे कृषी कर्ज प्रक्रियेत घर्षण (friction) कमी होते आणि कार्यक्षमता वाढते, असे त्यांनी नमूद केले.
सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी समावेशक कृषी मॉडेल्स आणि मूल्यसाखळी (value-chain) एकत्रीकरणावर भर दिला. त्यांनी शासकीय योजनांपर्यंत प्रवेश सुधारण्याची आणि तळागाळातील शेतकऱ्यांना पात्रतेची माहिती मिळवून देण्याची गरज अधोरेखित केली. तमिळनाडूतील सुमारे ८०% महिला सहभाग असलेला कार्यक्रम.सामूहिक शेतकरी समृद्धीसाठी मजबूत मूल्यसाखळी समन्वयाची आवश्यकता असल्याचे सांगितले.उत्पादन नियोजनापासून बाजारपेठ प्रवेशापर्यंत संपूर्ण परिसंस्थेचे संरेखन असणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी क्षेत्रातील शाश्वतता आणि समावेशकता वाढवण्यासाठी सहयोगी दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
समीर शाह यांनी कृषी-वित्त आणि पशुधन डिजिटायझेशन उपक्रमांमधील व्यावहारिक उदाहरणे सादर केली.कृषी क्षेत्रात AI चा विस्तार करण्यासाठी त्यांनी दोन महत्त्वाच्या बाबींवर भर दिला.जबाबदारीने कर्जवाटप वाढवण्यासाठी क्रेडिट गॅरंटी यंत्रणा मजबूत करणे.नवकल्पनांच्या स्वीकारासाठी नियामक सुधारणा आणि मानसिकतेत बदल आवश्यक. एआय आधारित वित्तीय प्रवाह राबवताना ‘मानव-केंद्रित डिझाइन’ अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
