Home आरोग्य सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त...

सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त पद

0
Vacant positions to provide state-of-the-art and high-quality healthcare services to the citizens of Satara district.

भरतीसह, एमआरआय व कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये व आरोग्य संस्थांतील विकासकामे, मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय व कॅथलॅब सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले. राज्यातील आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी सुमारे १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची ऑगस्ट महिन्यात रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या नियुक्त्यांमुळे शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब आणि आयुष रुग्णालयाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले.