
अमरावती आणि बडनेरादरम्यान चालत्या ट्रेनमधून बिबट्याने प्रवाशाला ओढल्याचा दावा करणारा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने फेरफार केलेला आहे. तसेच, टिटवाळा रेल्वे स्थानकावरील बिबट्याचा फोटो हा रेल्वे वेबसाइटवरील एका जुन्या फोटोत बिबट्याची प्रतिमा डिजिटल पद्धतीने जोडून तयार केला (मॉर्फ) आहे.