Home आरोग्य सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका...

सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (सायन रुग्णालय) येथे अत्याधुनिक

0
With the aim of making public healthcare services more robust and technology-driven, a state-of-the-art facility... at Lokmanya Tilak Municipal Medical College and General Hospital (Sion Hospital) in Mumbai.

पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णांना जलद आणि अचूक निदान सेवा मिळणार असून उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे मुंबईसह राज्यातील विविध भागांतील हजारो रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणारे महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रक्त तपासण्या करण्यात येत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत असतो. नव्याने उपलब्ध झालेल्या या उच्च क्षमतेच्या पूर्ण स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझरमुळे तपासणी अहवाल देण्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी होणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणात नमुन्यांची जलद प्रक्रिया करण्यास सक्षम असून त्यातून अधिक अचूक व विश्वासार्ह अहवाल उपलब्ध होणार आहेत. यामुळे रुग्णांच्या निदान प्रक्रियेला गती मिळून उपचार तातडीने सुरू करणे शक्य होईल. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

#सायनरुग्णालय

#SionHospital

#CSR