Home नंदुरबार नव-तेजस्विनी अंतर्गत महिला उधमशक्ती प्रशिक्षण – स्वयंपूर्णतेकडे पाऊल

नव-तेजस्विनी अंतर्गत महिला उधमशक्ती प्रशिक्षण – स्वयंपूर्णतेकडे पाऊल

Women Entrepreneurship Training under Nav-Tejaswini – A step towards self-sufficiency

महिला आर्थिक विकास महामंडळ (Mavim Nandurbar) ,CYDA ,युथ एड व रानिकाजल लोकसंचलित साधन केंद्र,मोलगी व तोरणा लोकसंचालित साधन केंद्र,धडगाव यांच्या वतीने नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा आणि धडगाव येथे अनुक्रमे २८-२९ मे आणि ३-४ जून २०२५ रोजी “उधमशक्ती विकास प्रशिक्षण” कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडल्या. या प्रशिक्षणात प्रत्येकी ३० महिलांचा सहभाग होता.

प्रशिक्षणाचे मुख्य मुद्दे:

पहिला दिवस:

उधमशक्ती संकल्पना: महिलांना नोकरी, व्यवसाय आणि उधमशक्ती यातील फरक समजावून सांगण्यात आला.

गट कार्य: सहभागींना चार गटांत विभागून टीमवर्कचा अनुभव देण्यात आला.

लक्ष्य निर्धारण व कल्पना निर्मिती: महिलांनी स्वतःची उद्दिष्टे ओळखून व्यवसाय कल्पनांचा विचार केला.

व्यवसाय संधी व SWOT विश्लेषण: बाजारपेठेतील गरजांवर आधारित व्यावहारिक योजनांची मांडणी केली.

दुसरा दिवस:

उत्पादन विकास व ब्रँडिंग: लोगो, पॅकेजिंग आणि नाव तयार करून ब्रँड ओळख विकसित करण्यावर भर.

मार्केटिंग व संवाद: प्रभावी विक्री आणि ग्राहक विश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टी शिकवण्यात आल्या.

नेतृत्व कौशल्य व व्यावसायिक व्यवस्थापन: ग्राहक सेवा, कायदेशीर कागदपत्रे व नफा-तोटा गणनेचा अभ्यास.

आर्थिक साक्षरता: वैयक्तिक व व्यावसायिक अर्थव्यवस्थेतील मूलभूत गोष्टींचे शिक्षण.

शासकीय योजनांची माहिती: PMEGP, CMEGP, PMFME अशा योजनांचा सखोल परिचय व अर्ज प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली.

प्रशिक्षणाचे परिणाम:

महिलांमध्ये आत्मविश्वासात वाढ झाली.

व्यवसाय सुरू करण्याबाबत स्पष्टता निर्माण झाली.

आणखी सखोल प्रशिक्षणाची मागणी नोंदवली गेली – विशेषतः वित्त, विपणन आणि डिजिटल साधनांबाबत.

या प्रशिक्षणाद्वारे महिला उद्योजकतेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करू लागल्या असून जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविमचे हे योगदान निश्चितच स्तुत्य आहे.

#EmpoweringWomen#MAVIM#TejaswiniYojana#WomenEntrepreneurship#Nandurbar#MAVIMSuccess#स्वयंपूर्णता#MAVIMNandurbar#WomenLedDevelopment#उधमशक्ती

error: Content is protected !!
Exit mobile version