Home नंदुरबार जिल्हा मनरेगा अंतर्गत सामूहिक वनहक्क क्षेत्रात कामाची सुरूवात : तळोद्यात नवा आदर्श

मनरेगा अंतर्गत सामूहिक वनहक्क क्षेत्रात कामाची सुरूवात : तळोद्यात नवा आदर्श

Work begins in collective forest rights area under MGNREGA: A new model in Talodia

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गायमुखी (274.82 हेक्टर) आणि वाल्हेरी (225.89 हेक्टर)या दोन ग्रामसभांना वर्ष 2018 मध्ये FRA 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंतर्गत सामूहिक वनहक्क (Community Forest Rights – CFR) प्राप्त झाले.

या वनहक्काच्या शक्तीचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. ग्रामसभांनी स्वतःच्या अधिकारक्षेत्रात मनरेगा अंतर्गत पहिल्या कामाची सुरुवात करून प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. हा उपक्रम ग्रामविकास, उपजीविका वाढ आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरत आहे.

FRA अंमलबजावणीचे मजबूत सहकार्य:

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील 20 गावांमध्ये FRA चे प्रभावी कार्यान्वयन सुरू आहे. ग्रामसभांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रशासन–वनविभाग–TISS या तिन्हींचे सुसंगत मार्गदर्शन सातत्याने मिळत आहे.

या प्रक्रियेत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, प्रकल्प अधिकारी अनय नवंदर, उपजिल्हा अधिकारी (मनरेगा) महेश चौधरी, उपवनसंरक्षक सुहास चौव्हान, RFO शांतनू सोनवणे, सहाय्यक अधिकारी देवेंद्र वाणी, जिल्हा समन्वयक अमोल राठोड, गायमुखी गार्ड संदीप भांडारी, वाल्हेरी गार्ड नामदेव डोंगरे, गायमुखी रोजगार सेवक पिंट्या वडवी, वाल्हेरी सामूहिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रायसिंग पाडवी, गायमुखी अध्यक्ष आशिराम वडवी, वाल्हेरी अध्यक्ष अमरसिंग नाईक, ग्रामस्थ, आणि TISS चे स्नेहा भानारकर व गणेश सुरपम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या समन्वयातून FRA अंतर्गत विकासाच्या प्रक्रिया गावांमध्ये अधिक वेगाने रुजू होत आहेत.

मनरेगा अंतर्गत दगडी नाला बांध कामाची सुरूवात:

आराखड्यात मंजूर असलेल्या दगडी नाला बांध (Stone Check Dam) या मनरेगा कामाचे उद्घाटन आज करण्यात आले.

हे काम 10 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून—

पाणीसाठा वाढ

भूजल पुनर्भरण

जंगलातील जैवविविधता संवर्धन

शेती आणि वनउपजीविकेचा विकास

या सर्वांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

सामूहिक वनहक्क–मनरेगा संयोजन : ग्रामीण विकासाचा नवा मार्ग

• ग्रामसभेच्या मालकीच्या वनक्षेत्रात स्वतःच्याच हक्काने नियोजन

• रोजगार निर्मिती

• टिकाऊ नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन

• वनाधारित उपजीविकेस चालना

हा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श असून, FRA चा प्रभावी वापर करून विकासाचा नवा नमुना तयार होत आहे.

[MGNREGA, Tribal Development]

error: Content is protected !!
Exit mobile version