Home शैक्षणिक के.डी.गावित सैनिकी विद्यालय व महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालय व महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

K.D.Gavit Sainiki Vidyalaya

(नंदुरबार) आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद संचलित के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पथराई ता.जि. नंदुरबार येथे दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी ” जागतिक आदिवासी दिवस ” उत्साहात संपन्न झाला. (World Adivasi Day celebrated in K.D.Gavit Sainiki Vidyalaya and college)

” जागतिक आदिवासी दिवस ” उत्साहात संपन्न (World Adivasi Day)

कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद चे चेअरमन राजेंद्रकुमार गावित हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून श्री. डी. एस.वसावे निवृत्त मुख्य प्रशासकीय अधिकारी जे. जे. हॉस्पिटल मुंबई. श्री वीरेंद्र वळवी माजी संचालक स्पर्धा परीक्षा विभाग उ.म.वी जळगाव.श्री.अर्जुन वळवी निवृत्त कक्षा अधिकारी बी. एस. एन. एल.नंदुरबार. डॉ. विशाल वळवी दीनदयाळ हॉस्पिटल नंदुरबार,श्री गिरीष वसावे सचिव जयहिंदला माता ट्राएबल एज्युकेशन सोसायटी धनराट नवापूर,श्री.मंगेश वळवी अभिनव विद्यालय नंदुरबार हे लाभले.

K.D.Gavit Sainiki Vidyalaya

के.डी.गावित इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केले आदिवासी नृत्य (K.D.Gavit Sainiki Vidyalaya)

याप्रसंगी सर्व वक्त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करत असताना मनमोकळेपणाने केले पाहिजे, निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रसंगी के.डी.गावित शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये के.डी.गावित इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन  हे श्री. महेंद्र बांगर सर व श्री. संदीप ईशी सर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम. के. बांगर सर यांनी केले.तर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शरद पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लक्षवेधी रांगोळी व सजावट (K.D.Gavit Sainiki Vidyalaya,Nandurbar)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व सदर कार्यक्रमाच्या संपूर्ण तयारीसाठी श्री. काशिनाथ सूर्यवंशी यांनी अतिशय लक्षवेधी रांगोळी व सजावटीसाठी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!
Exit mobile version