
शहादा(प्रतिनिधी):- झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा नैसर्गिक संसाधने, पर्यावरण, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे, जागतिक लोकसंख्या दिन लोकांना लोकसंख्या वाढीशी संबंधित संधी आणि आव्हानांवर चिंतन करण्याची संधी देतो. असे प्रतिपादन डॉक्टर डी वाय पाटील यांनी प्रमुख व्याख्याता म्हणून केले. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तर अंतर्गत जागतिक लोकसंख्या दिवस वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे एम पाटील प्रमुख व्याख्याता डॉ. डी वाय पाटील, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य जे बी पवार होते. पुढे बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले की जागतिक लोकसंख्या दिन का साजरा केला जातो? (इतिहास) 5 अब्ज दिन (Five Billion Day): 11जुलै 1987 रोजी जगाची एकूण लोकसंख्या 5 अब्ज (500कोटी) पार झाली होती. या आकड्याने संपूर्ण जगाला लोकसंख्या वाढीच्या वेगाबद्दल या घटनेतून प्रेरणा घेऊन, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) च्या गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पाटील म्हणाले की पहिला उत्सव अधिकृतपणे पहिला जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1990 रोजी 90 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा करण्यात आला. विश्व जनसंख्या दिवस 2026 थीम संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम ठरवली जाते असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी पवार एस बी
आभार प्रदर्शन श्रीमती वारुळे एन आर यांनी केले.