Home नंदुरबार जिल्हा काकासाहेब विद्यामंदिर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा

काकासाहेब विद्यामंदिर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा

2
World Tribal Day celebrated with enthusiasm at Kakasaheb Vidyamandir.

नंदुरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान, नंदुरबार संचलित काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी दिवस उत्साहपूर्ण व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून सहभाग घेतला. आदिवासी समाजाच्या कुलदेवता आई मोगी माता तसेच आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, रूढी तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षकांनीही आपल्या मनोगतातून विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिकांनी केले, तर इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिकांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पारंपरिक आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार नृत्य सादरीकरणाने झाली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या नृत्यातून विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा व लोककलेचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.