भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याची योजना म्हणजे जमीन मालकांसाठी एक मोठी कायदेशीर संधी आहे.
वर्ग-२ जमिनीत विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट असते. पण वर्ग-१ मध्ये रूपांतर होताच हे सर्व सरकारी निर्बंध निघून जातात.
जमीन १००% तुमच्या मालकीची होते. विक्री किंवा व्यवहारासाठी कोणाच्याही परवानगीची गरज उरत नाही.
फक्त एक अर्ज आणि रेडी रेकनरनुसार ठराविक शुल्क (प्रीमियम) भरून तुम्ही जमिनीचे मुक्त आणि स्वतंत्र मालक बनू शकता !
