Home महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली – डिजिटल शिक्षणाकडे नवी झेप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली – डिजिटल शिक्षणाकडे नवी झेप

Zilla Parishad Primary School, Gujar Bhawali – A new leap towards digital education

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली येथे इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (IGS) आणि HDFC बँक यांच्या CSR निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

या उपक्रमांतर्गत शाळेला पुढील सुविधा प्राप्त झाल्या आहेत :

डिजिटल रूम – विद्यार्थ्यांसाठी Teachmint कंपनीचा ७५ इंची स्मार्ट बोर्ड कार्यान्वित करण्यात आला असून त्यामुळे शिक्षण अधिक आधुनिक व प्रभावी होणार आहे.

अद्ययावत वाचनालय – विद्यार्थ्यांसाठी समृद्ध पुस्तकसंपदा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऍक्टिव्हिटी कॉर्नर – विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व कौशल्य विकासासाठी स्वतंत्र जागा निर्माण करण्यात आली आहे.

यावेळी पगारे साहेब (प्रमुख, HDFC बँक), कपालेश्वर सर (प्रोजेक्ट हेड, इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस) तसेच रीनाताई गोविंद नाईक (सरपंच, गुजर भवाली) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास IGS चे कर्मचारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सरला नाईक मॅडम, सहाय्यक शिक्षक नितेंद्र चौधरी सर, मोनी वळवी मॅडम, मंगल कोकणी मॅडम, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे शाळेला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवी दिशा मिळाली आहे.

HDFC बँक आणि इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस यांचे मनःपूर्वक आभार.

#DigitalEducation#SmartSchool#Nandurbar#ZPSchool#CSRInitiative#HDFCBank#QualityEducation#DigitalLearning#EducationForAll

error: Content is protected !!
Exit mobile version