Home नंदुरबार जिल्हा ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण – नंदुरबार व नवापूर येथे सामूहिक...

‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण – नंदुरबार व नवापूर येथे सामूहिक गायन कार्यक्रम संपन्न

150 years of the song 'Vande Mataram' - Group singing program held in Nandurbar and Navapur

‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रम पार पडले.

नंदुरबार:

नंदुरबार येथे संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने जी.टी.पी. कॉलेज मैदानावर ‘वंदे मातरम गीत सामूहिक गायन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भूषविले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रस्ताविक निदेशक श्री. गोपाल महाजन यांनी केले. सकाळी ९:५० वा. सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले. यानंतर मा. डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रेरणादायी अध्यक्षीय भाषण केले. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ या गीतावर आधारित भावनिक नाटिका सादर केली. मुख्य वक्ते श्री. गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास, अर्थ आणि त्यातील देशभक्तीची भावना यावर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सई वक्ते व श्री. जे. जी. अहिरराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती अश्विनी वराडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मा. श्री. धनंजय गोगटे (अति. जिल्हाधिकारी), मा. श्री. अनिल गावित (सहसंचालक, व्याव. शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक), मा. श्री. अमृतकर (नायब तहसीलदार), मा. श्रीमती सपना गोडसे पाटील (सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग), मा. श्रीमती स्नेहा सराफ (उपायुक्त, उत्पादन शुल्क विभाग), मा. श्री. महेंद्र रघुवंशी (प्राचार्य, जी.टी.पी. कॉलेज), मा. श्री. चौधरी (प्राचार्य, एकलव्य विद्यालय) यांसह विविध शाळांमधील २३०० विद्यार्थी तसेच १६५ शासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. वाय. एम. पाटील, उपप्राचार्य श्री. वाय. एस. पाटील, सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

नवापूर:

शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. शिवाजी हायस्कूल आणि श्री. शिवाजी महाविद्यालय, नवापूर येथे ‘वंदे मातरम गीत गायन दिन’ कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला श्री. दत्तात्रय जाधव (तहसीलदार, नवापूर), श्री. अभिषेक पाटील (पोलीस निरीक्षक), श्री. किरण गावित (गट विकास अधिकारी), श्री. आर. आर. देसले (गट शिक्षणाधिकारी), श्रीमती कमल कोकणी (शिक्षण संस्था प्रतिनिधी), श्री. कुणाल पाटील (उप निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क) यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात श्री. शिवाजी हायस्कूल, सार्वजनिक गुजराती हायस्कूल, वनिता विद्यालय, गुजराती माध्यमिक विद्यालय, श्री. शिवाजी महाविद्यालय, साई नर्सिंग कॉलेज, डी.जी. अग्रवाल मेमोरियल स्कूल आदी शाळा व महाविद्यालयांतील सुमारे २७५० विद्यार्थी तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ३६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

मुख्य समन्वयक श्री. एस. बी. बैरागी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केला.

‘वंदे मातरम’ — देशभक्तीचा अनमोल जयघोष, ज्याने प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेम जागवले.

#VandeMataram150Years#Nandurbar#SkillDevelopment#ITI#DistrictAdministrationNandurbar#CollectorOfficeNandurbar#डॉमित्तालीसेठी#धनंजयगोगटे#VandeMataram#NationalSongDay#NandurbarUpdates

error: Content is protected !!
Exit mobile version