
योजना – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता वितरणाचा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे “पी.एम. किसान उत्सव दिन” म्हणून मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी होत केंद्र शासनाच्या योजनांविषयी जाणून घेतले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती –
कार्यक्रमाचे उद्घाटक व विशेष अतिथी मा. आमदार डॉ. विजयकुमार गावित (नंदुरबार विधानसभा) होते. अध्यक्षस्थानी श्री केदारनाथ कवडीवाले (अध्यक्ष, डॉ. हेडगेवार सेवा समिती) होते.
प्रमुख उपस्थित–
कार्यक्रमाचे ठळक घटक –
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून २० व्या हप्त्याचे वितरण थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आले.
शेतीसाठी उपयुक्त माहिती व जनजागृती:
या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनांची थेट माहिती मिळाली. विविध FPO प्रतिनिधी, शेतकरी गट, आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे हा कार्यक्रम माहितीपूर्ण, संवादात्मक आणि प्रेरणादायी ठरला.
#PMKISAN#किसानउत्सव#नंदुरबार_शेती#KVK_कोळदा#ATMA_नंदुरबार#ShashvatSheti#NandurbarProgress#InspiredByDrMittaliSethi#AgriDevelopment