
गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून अंदाजे ३५५ स्थानिक व शासकीय कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर आरोपीचा मागोवा घेऊन पुणे येथील एका लॉजमध्ये सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणात आरोपीच्या राहत्या घराची झडती घेऊन सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹ ६५,८०,००० मुद्देमाल जप्त केली.
या कामगिरीबाबत नागपूर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते मासिक सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषण पुरस्कार मार्च २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.