
६ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
णमोकार तीर्थ विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, यामध्ये कुठलीही तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावी. भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थ स्थळी येण्याचे समाधान मिळायला पाहिजे, अशा पद्धतीने कामे करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते.