Home नंदुरबार जिल्हा युवकांना कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी

युवकांना कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी

A golden opportunity for youth to showcase their talents

(नंदुरबार) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन करणे, तसेच युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सद्गुण रुजवण्यासाठी शनिवार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता जी. टी. पी. कॉलेज, नंदुरबार येथील बॅडमिंटन (इनडोअर हॉल) येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यात सन 2025-26 या वर्षासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रकचे आयोजन करण्यात येत असून, त्याअनुषंगाने 15 ते 25 या वयोगटातील युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात समूह लोकनृत्य (10 कलाकार संख्या) व लोकगीत (10 कलाकार संख्या) या दोन मुख्य प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या दोन मुख्य प्रकारांव्यतिरिक्त कलालेखन, चित्रकला,वक्तृत्व, कविता लेखन या कला प्रकारांच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकार/सहकलाकार/साथसंगत देणारे यांचे वय 15 ते 29 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. (दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना 15 ते 29 असावी).

इच्छुक युवक-युवतींनी आपले अर्ज 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, नंदुरबार येथे सादर करावेत. लोकनृत्य व लोकगीत या स्पर्धांसाठी कोणत्याही प्रकारचे सिंथेसाईझर तसेच इलेक्ट्रॉनिक वाद्ये वापरण्यास परवानगी नाही. तसेच समूह लोकनृत्य यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत (टेप, सीडी, पेनड्राईव्ह इ.) वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर भ्रमणध्वनी क्रमांक 8888797922 यावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील कला, वाणिज्य व वरिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच महिला व युवक मंडळे, विविध कला व क्रीडा मंडळे आणि इच्छुक कलाकारांनी/स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version