Home महाराष्ट्र सातारा येथे पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनतर्फे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आले

सातारा येथे पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनतर्फे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आले

A house was built in Satara by the Police Housing Corporation for police officers and civil servants.

वृंदावन पोलीस टाऊनशीप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलीसांच्या कुटूंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पोलिसांच्या मुलांना चांगले वातावरण मिळावे, त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेक वेळा तासंतास सेवा बजावणारे पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावे या दृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यापूढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री. शशिकांत शिंदे, महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version