(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा आणि नागरिकहिताचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या सुचने नुसार परिवेक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांच्या हस्ते नवीन QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन वेळ निश्चित करता येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा संदेश:
“हा उपक्रम नागरिकांची वेळ वाचवण्यासाठी, कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आणि संवाद सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
#नंदुरबार#QRकोड#डॉमित्तालीसेठी#SmartGovernance#DigitalNandurbar#CitizenFriendlyInitiative#NandurbarDevelopment
