
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत वन विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी महोदयांनी बैठकीदरम्यान मनरेगा कामांना गती देण्यासाठी आणि योजनेंतर्गत ठोस प्रगती साधण्यासाठी स्पष्ट व तातडीचे निर्देश दिले.
पुढील दोन दिवसांत सर्व शेल्फ कामांचे Work Code NREGA Soft वर तयार करून घ्यावेत.
Work Code तयार होताच तालुका स्तरावर कामे तातडीने सुरू करण्यासाठी जबाबदारी निश्चित करावी.
प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) यांनी त्यांच्या क्षेत्रात एक मोठे काम सुरू करावे आणि त्यासाठी APO यांनी समन्वय साधावा.
तोरणमाळ वनपरिक्षेत्रासाठी १ PTO व १ CDEO मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे.
प्रत्येक ग्रामपंचायतीत दैनंदिन मनरेगा कामे सुरू राहतील याची काळजी घ्यावी.
शाश्वत मालमत्ता निर्मितीवर भर देत फळबाग लागवड, नॅडेप व व्हर्मी कंपोस्टसारख्या वैयक्तिक लाभाच्या कामांना चालना द्यावी.
‘आदर्श गाव योजना’ प्रभावीपणे राबवावी.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नमूद केले की, “मनरेगा योजना ही केवळ रोजगार निर्मितीची नव्हे, तर ग्रामीण भागातील शाश्वत विकासाची किल्ली आहे. सर्व विभागांनी नियोजनबद्ध व तत्परतेने काम करून जिल्हा आदर्श ठरवावा.”
#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#MGNREGA#मनरेगा#ग्रामीणविकास#EmploymentGuarantee#SustainableDevelopment#RuralEmpowerment#ForestDepartment#AgricultureDepartment#DistrictAdministration#SmartNandurbar#PrashasanAplyaDarbarat#VikasachiPrakashwata