Home महाराष्ट्र वाघ आणि बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित...

वाघ आणि बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित करण्यात आली आहे.

An artificial intelligence (AI)-based system that warns of possible attacks by tigers and leopards has been implemented in the Pench area.

रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या पिपरिया गावात गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले. तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे.

येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या- https://mahasamvad.in/194114/

#वाघ#बिबटे#एआय#कृत्रिमबुद्धिमत्ता#AI

error: Content is protected !!
Exit mobile version