
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येते की मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन विभागाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये शेळीपालन (Goatry) प्रकल्प राबविण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत झाळावाडी शेळी प्रजातीचा प्रसार वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रजातीचे आरोग्यदायी व टिकाऊ स्वरूप, कमी खर्चात पालन आणि ग्रामीण भागाला आर्थिक बळकटी देण्याची क्षमता लक्षात घेता प्रकल्प प्राधान्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
शेळीच्या विष्ठा व मूत्रापासून जैवखत (Bio-Fertilizer) तयार करण्यासाठी स्वतंत्र संशोधन व मूल्यवर्धन प्रकल्प सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात सेंद्रिय खत निर्मितीला चालना मिळेल आणि शाश्वत शेतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.
या उपक्रमासाठी MAFSU (महाराष्ट्र प्राणी व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन आणि प्रशिक्षण देणार आहे. प्रकल्पामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, महिलांचा सहभाग आणि पशुपालन क्षेत्राचे आधुनिकीकरण होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामसंघटनांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी पुढील टप्प्यांची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
#NandurbarAdministration#GoatryProject#झाळावाडीशेळी#DistrictCollector#DrMittaliSethi#Pashusavardhan#MAFSU#BioFertilizerProject#RuralDevelopment#SustainableAgriculture#AnimalHusbandry#NandurbarUpdates#GovernmentInitiative#OrganicFarming#EmploymentGeneration#FarmersSupport#AdminUpdate