Home क्रीडा कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

1
An international-standard cricket stadium in Kolhapur.

जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्टस् हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील १२.७६ हेक्टर (३१.९० एकर) शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व संबंधित क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य कराराअंतर्गत हस्तांतरित करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे व कोल्हापूर येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भाडेपट्टा करारनामा हस्तांतरणावर स्वाक्षरी केली.

#सामंजस्यकरार

#MoU