
लातूर: सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याकरिता विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, नगराध्यक्ष ॲड. स्वप्नील व्हत्ते, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, उपविभागीय अभियंता सूरज गौंड, दिलीप देशमुख, बाबासाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.