Home नंदुरबार जिल्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to apply for renewal of Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana

मुंबई: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२०२६ करीता अद्याप नूतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा पात्र विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्वयंम योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज http://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

विहित मुदतीत नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यास, त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीद्वारे निवड झालेली आहे व ज्यांना संबंधित वसतिगृहाकडून आवेदनपत्रे निर्गमित करण्यात आलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेत हस्तांतरित करण्यात येणार नाहीत, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version