Home नंदुरबार जिल्हा पद्म पुरस्कारांसाठी 31 जुलैपूर्वी ऑनलाईन नामांकने सादर करण्याचे आवाहन

पद्म पुरस्कारांसाठी 31 जुलैपूर्वी ऑनलाईन नामांकने सादर करण्याचे आवाहन

2
Appeal to submit online nominations for Padma Awards before July 31

(नंदुरबार) प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2027 रोजी घोषित होणाऱ्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्म पुरस्कारांसाठी’ (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) केंद्र शासनामार्फत नामांकने मागविण्यात आली आहेत. या पुरस्कारांसाठी पात्र आणि इच्छुक मान्यवरांनी विहित मुदतीत आपली ऑनलाईन नामांकने सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जाणारे हे सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, याबाबतचे अधिनियम आणि नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पद्म पुरस्कारांसाठीची सर्व नामांकने व शिफारशी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन नामांकन आणि शिफारशी सादर करण्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यानुसार पात्र व इच्छुक मान्यवरांनी वैयक्तिकरित्या आपले नामांकन पोर्टलवर सादर करावयाचे आहे.

पद्य पुरस्कारासाठी नामांकने/शिफारशीबाबत प्रस्ताव प्राप्त करणे व शासन मार्गदर्शक सूचनाप्रमाणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीद्वारे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र व्यक्ती आणि इच्छुक मान्यवरांची माहिती प्राप्त करुन सादर केलेल्या माहितीची पडताळणी करुन संगणकीय प्रणालीवर 31 जुलै 2026 पूर्वी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.