Home क्रीडा जिल्हा युवा पुरस्कारासाठी 21 एप्रिल पर्यंत अर्ज करावे

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 21 एप्रिल पर्यंत अर्ज करावे

Apply for the District Youth Award by April 21

सुनंदा पाटील

(नंदुरबार)

महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा वर्गातील युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य व जिल्हा युवा पुरस्कार सुरु करण्यात आले असून जिल्हा युवा पुरस्कार 2023-24 व 2024-25 या दोन वर्षासाठी 21 एप्रिल, 2025 अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हास्तर युवा पुरस्कारामध्ये एक युवक व युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 10 हजार व नोंदणीकृत संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 50 हजार असे पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहिती व विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एका जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 5 वर्ष वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात भरलेला अर्ज 8 ते 21 एप्रिल, 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित कागदपत्रे, 3 पासपोर्ट साईज फोटो, इत्यादि सर्व कागदपत्रे पुस्तिकीच्या स्वरुपात एकत्रित करुन बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.

शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा युवा पुरस्कार सन 2023 व 2024 या वर्षासाठी मूल्यांकन करण्यात येणार असून युवा व क्रीडा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य 01 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील तीन वर्षांमध्ये केलेले कार्य व कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, जनजाती आदिवासी भाग इत्यादिबाबतचे कार्यशिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभृण, व्यसनमुक्ती, तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच सामाजिक समस्या, महिला सक्षमीकरण आदिबाबत कार्य, साहस इत्यादिबाबतचे कार्य यानुसार मूल्यांकन होवून जिल्हा युवा पुरस्कार 1 मे, 2025 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, मोबाईल 8888797922 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version