Home सरकारी योजना मिरा–भाईंदर शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन...

मिरा–भाईंदर शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ही काळाची गरज होती.

As the population and number of vehicles in Mira-Bhayander city is increasing rapidly, a separate Sub-Regional Transport Office was the need of the hour.

कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व गतिमान होईल. नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाने, नूतनीकरण तसेच इतर सर्व परिवहन विषयक सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून, प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version