#शहादा तालुक्यातील #काथरदे गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी थेट भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील सरदार सरोवर पुनर्वसनात येणाऱ्या समस्या समजून घेतल्या. गावकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील याची खात्री दिली.
शहादा तहसीलदार दीपक गिरासे, सामाजिक कार्यकर्ते लतिका राजपूत, चेतन साळवे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सकारात्मक संवाद झाला.
लोकाभिमुख प्रशासनाची खरी ताकद यशस्वी लोकसंवादात आहे !