Home शहादा शहादा येथे 24 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी व्यक्तींसाठी जाणीव जागृती कार्यशाळा

शहादा येथे 24 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी व्यक्तींसाठी जाणीव जागृती कार्यशाळा

Awareness workshop for transgender individuals in Shahada on August 24.

(नंदुरबार) केंद्र शासनाचा ‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019’ व ‘नियम 2020’ देशभरात लागू करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार तृतीयपंथीय व्यक्तींना त्यांच्या हक्क व अधिकारांची सविस्तर माहिती व्हावी, तसेच योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोमवार, दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता पंचायत समिती, शहादा येथे विशेष जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी कळविली आहे.

या कार्यशाळेत तृतीयपंथीय व्यक्तींचे कायदे, अधिकार आणि विविध कल्याणकारी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी शहादा तालुक्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी तसेच या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version