Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारात ‘बोलावा विठ्ठल’ भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम 25 जुलै रोजी

नंदुरबारात ‘बोलावा विठ्ठल’ भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम 25 जुलै रोजी

2
'Bolava Vitthal' melodious devotional music program in Nandurbar on July 25.

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदनगरीतील विठ्ठलभक्तांसाठी घासकडबी परिवारातर्फे शनिवार, दि.25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘बोलावा विठ्ठल’ या भक्तिसंगीताच्या सुभग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कन्यादान मंगल कार्यालय, अहिंसा चौक, नंदुरबार येथे होणार असून, विठ्ठलभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या भक्तिसंगीत कार्यक्रमात पार्थ घासकडबी व मृण्मयी भावसार हे गायक भक्तिरसाची मैफल रंगविणार आहेत. प्रसन्न दाऊतखाने हे संवादिनीची साथ करणार असून, ऋतुपर्ण डांगे आणि रोहन पांगारकर हे तबल्याची साथ देणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तन्वी पांगारकर करणार आहेत.
या कार्यक्रमास श्री जी सार्वजनिक वाचनालय, नंदुरबार यांचे सौजन्य लाभले असून, विठ्ठल भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.