Home नंदुरबार जिल्हा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
Call for applications for various loan schemes through the Mahatma Phule Backward Class Development Corporation.


(नंदुरबार) अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा’कडून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.टी. बागुल यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून महामंडळामार्फत प्रामुख्याने तीन योजना राबविल्या जातात, ज्यामध्ये बँकेच्या माध्यमातून ’50 टक्के अनुदान योजना’ व ‘बीजभांडवल योजना’, तसेच महामंडळाची ‘थेट कर्ज योजना’ यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 यामध्ये जिल्हा कार्यालयासाठी 50 टक्के अनुदान योजना: 05 लाभार्थी, बीजभांडवल योजना: 05 लाभार्थी व थेट कर्ज योजना: 10 लाभार्थी असा उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.

या कर्ज योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद समोर, टोकरतलाव रोड, नंदुरबार’ येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. तेथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपला कर्जमागणीचा अर्ज सादर करावा, असेही महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा व्यवस्थापक बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.