धडगाव येथे आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघाचे मा. आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या नव्या कार्यालयामुळे दुर्गम व आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य, पोषण आणि अंगणवाडी सेवांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळणार आहे.
या कार्यालयाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य, अंगणवाडी सेवा तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
धडगाव, खुंटामोडी आणि तोरणमाळ प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांना या कार्यालयामुळे नवे बळ मिळणार असून, हे केंद्र नागरिकांसाठी आदर्श सेवा केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#धडगाव#बालविकासप्रकल्प#डॉमित्तालीसेठी#आमश्यादादापाडवी#महिलावबालविकास#अंगणवाडी#माताबालआरोग्य#पोषणअभियान#नंदुरबार#TribalDevelopment#ChildDevelopment#Nandurbar#Dhadgaon#ICDS#WomenAndChildDevelopment
