Home महाराष्ट्र ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा

Citizens in dangerous buildings in Thane city should get immediate relief

क्लस्टर योजनेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे समूह विकास प्रकल्प आणि एमआयडीसीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर योजना जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी ही योजना महाप्रीत कडून एमएसआरडीसी कडे हस्तातंरित करावी. ठाणे एमआयडीसीची ६०.७२ हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसन प्रकल्पासाठी लवकर हस्तांतरित करण्याचे निर्देश देतानाच ठाणे जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांना ‘व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट’ घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे समूह विकास प्रकल्प आता ‘महाप्रीत’ ऐवजी एमएसआरडीसीकडून करण्यात येणार असून या बदलासाठी आवश्यक असणारी हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आणि सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version