Home महाराष्ट्र भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरक्षण निश्चिती करा

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरक्षण निश्चिती करा

Confirm reservation as per the guidelines of the Election Commission of India.

वर्धा : ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी विविध प्रवर्गाकरीता राखून ठेवावयाच्या जागेची आरक्षण निश्चिती भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निश्चिती करावी, अशा सुचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वत्रिक व पोट निवडणूकी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी रमा जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, हिंगणघाटचे आकाश अवतारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, आठही तहसिलचे तहसिलदार उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीबाबत न्यायालयाने आदेश दिल्यास दिवाळीनंतर निवडणूका घेण्यात येईल. यासाठी सर्व संबंधित विभागांनी निवडणुकीसाठी तयारी करावी. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी वर्ग कमी पडत असल्यास इतर विभागातील कर्मचा-यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करावी. आराक्षण निश्चितीबाबत अडचण असल्यास निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घ्यावे, अशा सुचना दिनेश वाघमारे यांनी केल्या.

उपलब्ध असलेल्या इव्हीएम मशीन सोबतच आयोगाकडे प्राप्त झालेल्या अत्याधुनिक नवीन इव्हीएम मशीन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नवीन मशीनमध्ये बदल असलेल्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुरविण्यात येणा-या मशीनसाठी गोदाम उपलब्ध करुन ठेवावे. या गोदामामध्ये सीसीटीही कॅमेरे, फायर सुरक्षा, लाकडी प्लॅटफार्मवर लोखंडी रॅकची सुविधा असावी.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील 519 ग्राम पंचायतीपैकी सन 2024 मध्ये 315 ग्रामपंचायत, सन 2025 मध्ये 1 ग्रामपंचायत, सन 2026 मध्ये 50 ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून 2 नवनिर्मित ग्रामपंचायत असून अशा एकुण 368 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याचे तसेच सदस्याचे आरक्षण निश्चित करतांना उद्भवणा-या अडचीणी व 50 टक्केच्या मर्यादेत आरक्षण निश्चित झालेल्या ग्रामपंचायती, 50 टक्के च्या वर आरक्षण जात असलेल्या ग्रामपंचायतीची माहिती तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या इव्हीएम मशीनच्या संख्येची माहितीचा तपशिल बैठकीत सांगण्यात आला.

error: Content is protected !!
Exit mobile version